स्वच्छ शाळा, सुंदर शाळा.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती

अहिंसा दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड, ता- यावल जि- जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने प्रतिमांचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थी देवयानी हिरालाल धनगर, खुशी नथू तडवी, खुशी लीलाधर काटे, आकांक्षा कैलास ठाकूर या विद्यार्थिनींनी महात्मा गांधी यांचे जीवनावर आधारित भाषणे सादर केली. शाळेतील शिक्षक संदीप पितांबर बारी, शेख महेबूब शेख बशीर, दीपक वसंतराव चव्हाण,  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थी अर्जुन वसंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.

शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र शामराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील तत्त्वांचा अवलंब आपल्या जीवनात करून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असे मार्गदर्शन करून रघुपती राघव राजाराम या भजनाचे गायन  विद्यार्थ्यांकडून  घेतले. भाषण सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे पेन देऊन अभिनंदन करून आणि उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा, शिरसाड येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

               दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक, शाळा, शिरसाड ता- यावल जि- जळगाव या शाळेमध्ये ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय आवर स्वच्छता तथा सुशोभन  करून परिसर सुशोभित करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनी प्रातःकाळी गावातून शालेय बँड पथकासोबत उत्साहवर्धक घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान गावातील या वर्षी राज्य राखील पोलीस दलात भरती झालेले श्री. विलास प्रकाश कोळी  यांना जवानाला देण्यात आला.

            त्यानंतर शालेय परिसरामध्ये ध्वजारोहणासाठी उपस्थित मौजे शिरसाड गावाचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे, उपसरंच श्री. राजू बन्सी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्री जावेद हमीद तडवी,  ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, इतर सर्व पदाधकारी, तलाठी कीर्ती कदम, पोलीस पाटील दीपाली रविंद्र धनगर, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका तथा मदतनीस, आशा सेविका, निपुण भारत अंतर्गत लीडर माता, ज्येष्ठ नागरिक, युवक माजी विद्यार्थी, आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक यांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी शालेय ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जावेद हमीद तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी शाळेतील उपशिक्षक श्री राजेंद्र प्रकाश अटवाल यांनी उपस्थितांकडून संविधानाचे वाचन करूवून घेतले. 

        त्यानंतर गावाचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम राज्य राखील पोलीस दलात भरती झालेले गावातील जवान आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. विलास प्रकाश कोळी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. इयत्ता १ली मधील प्रेरणा कमलाकर धनगर या विद्यार्थिनीचा वाढदिवस असल्याने तिला एक पेन भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.  यावेळी शाळेतील आकांक्षा कैलास ठाकूर, खुशी लीलाधर काटे, देवयानी हिरालाल धनगर, पुरब अतुल महाजन या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषणे केली. त्यानंतर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. शाळेतील शिक्षक शिक्षक महेबूब यांनी भारतीय स्वातंतत्र्य लढ्याचा इतिहास उलगडून सांगितला. 

            महावाचन चळवळ अंतर्गत वाचन संस्कृती रुजण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय बाल ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनास भेट दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध रांगोळ्यांचे मान्यवरांनी निरीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली. या कार्यक्रमामध्ये मतदान जनजागृती शपथ, तंबाखूमुक्त भारत, तिरंगा प्रतिज्ञा, निपुण भारत याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याने प्राप्त पारितोषिकाच्या रकमेमधून शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लेखन वाचन साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळेची ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. रवींद्र शामराव पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहून शाळेमधील विविध बाबींची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात  ग्रामपंचायत चे सन्माननीय सरपंच श्री. दीपक इंगळे यांनी  उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन देशभक्तीपर गीत सादर करत सर्वांचे लक्ष वेधले.

             उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी शालेय कार्यक्रमाबद्दल व विद्यार्थी सहभागाबद्धल  समाधान व्यक्त करत शाळेला शुभेच्छा दिल्या. यावेळी या शैक्षणिक वर्षातील लोकसहभागाबाबत आणि शालेय उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक वसंतराव चव्हाण सर तर आभार प्रदर्शन श्री. शिवदास पंडित महाजन सर यांनी केले. उपसरपंच राजू बन्सी सोनवणे यांनी उपलब्ध करून दिलेली जिलेबी व ग्रामपंचायत कडून उपलब्ध चॉकलेट्स इत्यादी खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिरसाड येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

       दि. 31/07/2024 रोजी जि. प. प्राथमिक शाळा, शिरसाड येथे साकळी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षक परिषद संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रेडेड मुख्याध्यापक पदी  पदोन्नती होऊन नव्याने पदभार स्वीकारलेल्या संगिता धनंजय पाटील मॅडम या होत्या. 

   यावेळी जि. प. शाळा, डांभूर्णी येथे ग्रेडेड मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेले संजय पाटील आणि जि. प. शाळा खिरोदा ता- रावेर जि- जळगाव येथे ग्रेडेड मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेल्या संगिता पाटील यांचा सत्कार करण्यात आल. त्याचबरोबर लोकराजा राजश्री शाहू राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने शिरसाड जि. प. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील यांचे तर साकळी जि.प. शाळेतील रविंद्र ठाकरे यांचे महाराष्ट्र शिक्षक पॅनल मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सर्व सत्कारमूर्तींनी कामाप्रती आपली कटिबद्धता बोलून दाखवत अजून जोमाने कार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले. 

       यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2023-24 अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा, शिरसाड या शाळेला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल तेथील सर्व शिक्षक समूहाचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. साकळी उर्दू शाळेचे शिक्षक आरिफ खान यांचेही त्यांनी प्रकाशित केलेल्या "जंगल में ईद" पुस्तकाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

        शिक्षण परिषदेत साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून सेतू निपुण चाचणी अंतर्गत पूर्वस्थिती व उत्तरस्थिती बाबत आढावा घेतला तर उपशिक्षक विरेंद्र सोनवणे यांनी पायाभूत चाचणी बाबत मार्गदर्शन करून  करावयाच्या उपाययोजना बाबत माहिती दिली. "वंचितांचे शिक्षण" बाबत मार्गदर्शन करताना दगडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ईश्वर तागड यांनी यातील अडचणी व उपाययोजना बाबत उपस्थित शिक्षकांमध्ये चर्चा घडवून आणली. साकळी शाळेतील शिक्षक सचिन धालपे यांनी "लिहिते होऊ या"  यासंदर्भात स्थानिक उदाहरणासह सखोल मार्गदर्शन  करून उपस्थित शिक्षकांना साहित्य लेखनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. सूत्रसंचालन संदीप बारी यांनी केले. केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी स्थानिक पातळीवरील प्रशासकीय बाबींबाबत मार्गदर्शन केल्यानंतर दीपक चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनानंतर शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२३-२४ अंतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 

  दि 19/07/2024 रोजी पंचायत समिती सभागृह यावल येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत विजय शाळांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

        यावेळी या अभियानात आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड शाळेला यावल पंचायत समितीच्या BDO डॉ. मंजुश्री गायकवाड मॅडम, गटशिक्षणधिकारी श्री विश्वनाथन धनके साहेब, यावल तालुक्यातील सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख, इतर सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

       यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद तडवी, उपाध्यक्ष रिंकू लीलाधर काटे, सदस्या ज्योती कैलास ठाकूर आणि शाळेचे ग्रँड मुख्याध्यापक श्री रविंद्र पाटील, व सर्व शिक्षक वृंद यांनी हे पारितोषिक स्विकारले....!!

        सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व दोन लाख रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

     हा सन्मान शिरसाड शाळेच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना व  ग्रामस्थ व  सर्व पदाधिकाऱ्यांना समर्पित...!!"

धन्यवाद....!!!

जि. प. प्राथ. शाळा, शिरसाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती उत्साहात साजरी

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव  येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रिंकू लीलाधर काटे या होत्या. सरपंच दिपक वामन इंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील उत्कर्षा प्रभाकर जाधव, वेदिका प्रवीण धनगर, ख़ुशी लीलाधर काटे, देवयानी हिरालाल धनगर, प्रगती हरिचंद्र पाटील, भारती गोपाल जुमडे, आकांक्षा कैलास ठाकूर, यशवंती गणेश बडगुजर, भरतर गणेश बडगुजर या विद्यार्थ्यांनी तर राजेंद्र प्रकाश अटवाल, शेख महेबूब, दीपक वसंतराव चव्हाण या शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. 

              शिरसाड गावाचे सरपंच  दिपक वामन इंगळे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्ष शब्दातून मांडत, भीमगीत गाऊन उपस्थितांना भावूक केले. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर शाळेमध्ये निबंधलेखन आणि  रंगभरण स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमास  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद हमीद तडवी, सदस्य विश्वनाथ रघुनाथ धनगर, ज्योती कैलास ठाकूर, तसेच पालक प्रमोद इंगळे, शालेय विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.  शाळेचे  शिक्षक राजेंद्र जगन्नाथ महाजन  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

१९ फेब्रुवारी २०२४

    दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ वार सोमवार रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जावेद हमीद तडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. 

    त्यानंतर झालेल्या सभेच्या कार्यक्रमात कु. यशवंती गणेश बडगुजर, कु. ख़ुशी लीलाधर काटे, अनिकेत प्रमोद इंगळे, भरतर गणेश बडगुजर इत्यादी शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी सभेचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जावेद हमीद तडवी हे होते. शाळेतील उपशिक्षक श्री. शेख महेबूब शेख बशीर, श्री. शिवदास पंडित महाजन, श्री. राजेंद्र जगन्नाथ महाजन, श्री. अटवाल प्रकाश अटवाल यांच्या शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. रविंद्र शामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ डॉ. दिलीप बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. रिंकू लीलाधर काटे, सदस्य सौ. अमिना नथ्थू तडवी, लीडर माता भूराबाई तडवी, ग्रामस्थ डॉ. दिलीप बडगुजर यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम संपन्न

      दि 12 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान अंतर्गत महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन सध्या राज्यभरातील शाळांमध्ये चालू आहे. या अंतर्गत विविध तीस मुद्द्यांना भारांश  निश्चित करून गुण देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत भारतातील एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा, देशाच्या जडणघडणीतील योगदान, वेशभूषा, खानपान याविषयी सादरीकरणास पाच गुण ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शिरसाड शाळेने महाराष्ट्र राज्याची निवड करून महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा, देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्र राज्याचे योगदान, महाराष्ट्रातील सण व उत्सव, पेहराव, खानपान यांसह देशासाठी योगदान देणारे महाराष्ट्रातील नेते, कलावंत, पत्रकार, क्रीडापटू इत्यादींचा छायाचित्राच्या मदतीने देखावा साकारण्याचा प्रयत्न केला. 

    सदर कार्यक्रमास यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी विशेष उपस्थिती देऊन उद्घाटन केले. त्याचबरोबर शिरसाड चे उपसरपंच श्री राजू बन्सी सोनवणे, माजी सरपंच प्रविण सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रिंकू लिलाधर काटे, सदस्य ज्योती कैलास ठाकूर यांच्यासह इतर माता पालक हजर होत्या. उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र दर्शन अंतर्गत केलेले सादरीकरण पाहिले व या ठिकाणी मांडलेल्या महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा  आनंद घेत मांडलेल्या इतर बाबींचे निरीक्षण केले. त्याचबरोबर विश्वनाथ धनके यांनी विद्यार्थ्यांना मांडलेल्या देखाव्यांबद्दल माहिती विचारली. यावेळी शाळेतील शिक्षक सागर चौखंडे व विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रतापगडाची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. खानपान मध्ये पुरणपोळी, भरीतपुरी, कळण्याची भाकर, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, कांदा भजी, मूंग भजी, कढी, वरण-भात, कांदा पोहे, वडापाव, मिसळ पाव, शीरखुर्मा, शेंगदाण्याची चटणी, शेवभाजी, पाटोळ्यांची भाजी, पिठले भाकर, भेळ, उडदाची डाळ, विविध प्रकारचे पापड इत्यादी पदार्थांची मांडणी करण्यात आली होती. त्याचबरोबर सण-उत्सवांतर्गत शिवजयंती, दुर्गोत्सव, भीम जयंती, गणेश उत्सव, गोपाळकाला, रक्षाबंधन, नागपंचमी, बैलपोळा, आषाढी एकादशी इत्यादी बाबत देखावे सादर केले होते.

     या कार्यक्रमास गावातील अंगणवाडी सेविका तथा मदतनीस कोकिळा पाटील, वैशाली भालेराव, मदीना तडवी इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थी तथा शिक्षक आणि अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी महाराष्ट्रीय पेहराव केला होता. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक यांनी आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा याबाबत विद्यार्थ्यांना ओळख होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी शाळेतील परसबागेची पाहणी करून 'बाला प्रोजेक्ट' विषयी आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेतील शिक्षक राजाराम खजान मोरे, राजेंद्र प्रकाश अटवाल, संदीप पितांबर बारी, शिवदास पंडित महाजन, राजेंद्र जगन्नाथ महाजन, शेख मेहबूब शेख बशीर, सागर गणेशराव चौखंडे आणि दीपक वसंतराव चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

     सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान चालू आहे. सदर अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शिक्षिका संगीता धनंजय पाटील या होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे अध्यक्ष जावेद हमीद तडवी तथा उपाध्यक्ष रिंकू लीलाधर काटे या होते. 

         सदर विद्यार्थी मेळाव्यास 250 पेक्षा जास्त सध्या इतर शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा एका शाळेच्या माजी विद्यार्थीनीने केले. यावेळी शाळेमध्ये कार्यरत असलेले  शाळेचे माजी विद्यार्थी  तथा शाळेचे उपशिक्षक राजेंद्र अटवाल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना स्वतः  शाळेचे माजी विद्यार्थी या भूमिकेतून मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अकरा विद्यार्थिनींनी स्वतःचे मनोगत मांडले. शाळेची बदलती परिस्थिती यावर अनेक विद्यार्थ्यांनी भाष्य केले. शालेय जीवनातील अनेक सुखद आठवणी यावेळेस सांगितल्या. यावेळी शाळेतील शिक्षक संदीप बारी, शिवदास महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या भावी भविष्यासाठी मार्गदर्शन केले तर उपशिक्षक सागर चौखंडे,  दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी मार्गदर्शन केले. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्यादिशेने प्रयत्न केले पाहिजे असे मत शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख वक्ता संगीता धनंजय पाटील मॅडम यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी सखोल असे मार्गदर्शन करत जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक गुरु मंत्र दिले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आपले अध्यक्ष भाषण संपवले.

    प्रथमच शिरसाड येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या दिवशी आयोजित पुस्तक प्रदर्शनास भेट दिली व समाधन व्यक्त केले. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना यावेळी शाळेकडून खिचडीचा लाभ घेण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांच्या बालपणाचे दिवस आठवल्याचे मत व्यक्त केले. आपल्या जुन्या शाळेमध्ये शिक्षकांनी सन्मान देऊन सर्व विद्यार्थ्यांना बोलावले याबद्दल सर्व विद्यार्थी यांनी शाळेचे आभार व्यक्त केले.

      शाळेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी व्हावा यासाठी शाळेतील शिक्षक  राजाराम गजानन मोरे आणि राजेंद्र जगन्नाथ महाजन यांनी विशेष प्रयत्न केले.

महावाचन चळवळ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

       ध्या राज्यभर प्रत्येक शाळेमध्ये महावाचन चळवळ अभियान चालू आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच  दीपक वामन इंगळे यांनी केले. यावेळी गावचे उपसरपंच राजू बन्सी सोनवणे ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील उल्हास रूपचंद ढाके, गायत्री विनोद सोनवणे, कविता प्रमोद सोनवणे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद तडवी, उपाध्यक्ष रिंकू लीलाधर काटे, सदस्य ज्योती कैलास ठाकूर, विश्वनाथ रघुनाथ धनगर, हेमलता निंबाजी महाजन, गावच्या पोलीस पाटील दिपाली रवींद्र धनगर, गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस, गावातील तरुण-तरुणी प्रतिष्ठित नागरिक, माजी-आजी विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी प्रदर्शनास भेट देऊन शाळेमधील उपलब्ध पुस्तकांविषयी माहिती घेतली. विविध विषयांवर आधारित पुस्तक हाताळण्याचा मोह अनेकांना आवरता  आला नाही.

        आजच्या इंटरनेटच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पुस्तक संस्कृती ही रुजली पाहिजे अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी सदर प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करत शाळेचे अभिनंदन केले. खऱ्या अर्थाने आपले ज्ञान वाढण्यासाठी पुस्तक वाचन महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले.

     सदर पुस्तक प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी शाळेतील उपशिक्षक सागर गणेशराव चौखंडे यांनी विशेष प्रयत्न केले. 

मकरसंक्रातीनिमित्य हळदी कुंकू कार्यक्रम

आमच्या जि प प्राथमिक शाळा,शिरसाड ता .यावल  येथील शाळा व्यवस्थापन समितीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाळेमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी अनेक महिलांनी उपस्थिती देऊन दिला.याप्रसंगी उपस्थित मित्रांना आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी कुंकू लावून वाण स्वरूपात पेन्सिल भेट दिली .      

 त्याचबरोबर उपस्थित महिलांना  निपुण भारत अंतर्गत आयडिया व्हिडिओज दाखवण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करावयाच्या बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सर्व महिलांनी शाळेमध्ये हळदीकुंकवाला बोलवल्याबद्दल शाळेचे आभार मानले.

राष्ट्रमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद जयंती

           दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिरसाड येथे राष्ट्रमाता जिजाबाई तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री रविंद्र पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद तडवी आणि सदस्य सौ रिंकू लीलाधर काटे आणि सौ ज्योती कैलाश ठाकूर तसेच विद्यार्थी,पालक उपस्थित होते. प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ रिंकू लीलाधर काटे आणि सौ ज्योती विलास ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले.विद्यार्थीनीनी जिजामातेचा वेश परिधान करून सर्वाचे लक्ष खेचले.कार्यक्रमाचे संचालन श्री दीपक चव्हाण सर यांनी केले.प्रसंगी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांनी भाषणातून व्यक्त केले. ख़ुशी काटे, भारती जुमडे, उत्कर्षा  जाधव, नंदिनी धनगर, सुमित सपकाळे, पाकिजा तडवी, अंकिता सपकाळे, विद्या खंबायत, वेदिका धनगर, पूजा साळी, आकांक्षा ठाकूर, प्रगती पाटील या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यानंतर श्री राजेंद्र महाजन सर,श्री संदीप बारी, श्री सागर चौखंडे सर यांनी थोरपुरुषाबद्दल विचार व्यक्त केले. श्री राजाराम मोरे आणि सागर चौखंडे सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रयत्न केले.शेवटी मुख्याद्यापक रविंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बालिका दिन

     आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून साजरी करण्यात आली.प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र शामराव पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आल. कार्यक्रमाचे संचालन श्री दीपक चव्हाण सर यांनी केले. अमन तडवी, यशवंती बडगुजर, पाकीजा तडवी जान्हवी इंगळे, आलिया तडवी, उत्कर्षा जाधव, हर्षदा अलकरी भरतर बडगुजर, अनिकेत इंगळे, देवयानी धनगर, विद्या खंबायत,आकांशा ठाकूर, किमया महाजन,खुशी काटे, दामिनी इंगळे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

 

    प्रसंगी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे  यांचे विद्यार्थ्यांसाठीचे  संबोधन पत्र विद्यार्थ्यांसमोर श्री एस. पी. महाजन सर यांनी वाचून दाखवले. त्यानंतर श्री आर जे महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा दिला. श्री सागर चौखंडे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.श्री महेबूब  शेख सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सावित्रीबाई फुले यांचे कार्य पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राजाराम मोरे ,श्री राजेंद्र अटवाल यांनी परिश्रम घेतले.शेवटी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्षीय भाषण करून कार्यक्रमाची सांगता केली.

सावित्रीबाई फुले दत्ताक पालक योजने अंतर्गत इयत्ता १ ली ची विद्यार्थिनी वेदिका प्रकाश भालेराव हिची निवड करण्यात आली.


बाल आनंद मेळावा

  दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिरसाड गावचे सरपंच दीपक वामन इंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेतील उपशिक्षक संदीप पितांबर बारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना आनंद मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला तर विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी आशा मेळाव्याचे महत्त्व शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांनी नमूद केले. मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले साकळी  केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर संतोष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वाचन-लेखन-गणन यासह व्यवहार ज्ञानाचे महत्त्व सांगितले.

      शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद हमीद तडवी यांच्यासह मंचावर उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते दीपप्रज्वलन करून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या 76 विद्यार्थ्यांनी यांत प्रत्यक्ष  सहभाग नोंदवला तर इतर विद्यार्थ्यांनी खरेदीचा आनंद घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, फळे , भाजीपाला, लेखनसाहित्य इ. ची खरेदी विक्री केली. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. शालेय अभ्यासासोबत व्यवहार ज्ञानही विद्यार्थ्यांना समजावे त्यांना हिशेब करता यावा, व्यवहारज्ञान कौशल्य विकसित व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    शिरसाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजू बन्सी सोनवणे, सदस्य ज्योती प्रविण सोनवणे, ग्रामसेवक  एस एन चौधरी, गावच्या पोलीस पाटील दीपाली रविंद्र धनगर, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य ज्योती कैलास ठाकूर, मंदाताई दिनेश अलकरी, अमिना नत्थु तडवी, विश्वनाथ रघुनाथ धनगर, हेमलता निंबाजी महाजन, दीपक प्रकाश सोनवणे, गावातील सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद सोनवणे यांच्यासह  गावातील प्रतिष्ठीत नागरिक, युवक-युवतीसह शाळेचे माजी विद्यार्थी आणि पालक यांनी आनंद मेळाव्याला उपस्थिती देऊन खरेदी चा आनंद आणि लाभ घेतला. यावेळी सर्व उपस्थितांच्या आणि विद्यार्थ्यांच्या  चेहर्‍यावर आनंद, उत्साह आणि समाधान दिसत होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक दीपक वसंतराव चव्हाण यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सागर गणेशराव चौखंडे, राजाराम खजान मोरे, शिवदास पंडित महाजन, राजेंद्र जगन्नाथ महाजन, शेख महेबुब शेख बशीर, राजेंद्र प्रकाश अटवाल या शिक्षकांनी परिश्रम केले.


  श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती

    आज दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड, येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री रवींद्र पाटील तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. प्रथम प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण शाळेचे मुख्याद्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री दीपक चव्हाण सर यांनी जगनाडे महाराज यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच शाळेतील शिक्षक श्री शेख सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जगनाडे महाराज यांचे विचार सविस्तरपणे वर्णन करून सांगितले.श्री अटवाल सर यांनी अभंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगनाडे महाराज यांच्या कार्य विषयी माहिती सांगितली.

शेवटी मुख्याद्यापक यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

आज दि.६ डिसेंबर २०२३ रोजी जि.प. प्राथमिक शाळा,शिरसाड येथे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आला.  प्रसंगी प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवास्थापन समिती अध्यक्ष जावेद तडवी उपस्थित होते.प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जावेद तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यास श्री सागर चौखंडे सर यांनी अनुमोदन दिले.प्रथम अध्यक्ष्याच्या  हस्ते प्रतिमा पूजन तसेच हारर्पण करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषने दिली. श्री दीपक चव्हान सर यांनी बाबासाहेबांच्या आयुष्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच श्री शिवदास महाजन यांनी बाबासाहेबाच्या अभ्यासु वृत्ती वर मुलांना सांगितले.श्री अटवाल सर यांनी चवदार तळ्याचे पाणी हि कविता सदर करून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. श्री. बारी सर यानी बाबासाहेबांबद्दल आपले विचार मांडले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांनी बाबासाहेबांच्या विचारांना वंदन करून मुलांना मार्गदर्शन केले . 


डॉ.अब्दुल कलाम जयंती अर्थात वाचण प्रेरणा दिन साजरा  तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे प्रात्यक्षिक

     आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी जि प प्राथमिक शाळा,शिरसाड येथे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचन प्रेरणा दिवस तसेच जागतिक हात दुवा दिन साजरा करण्यात आला.प्रसंगी शाळेचे ग्रेडेड मुख्याद्यापक श्री रवींद्र पाटील,सहकारी शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री विश्वनाथ धनगर,सौ ज्योती कैलाश ठाकूर तसेच पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

     प्रथम शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते डॉ अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करण्यात आले.श्री दीपक चव्हाण सर यांनी प्रास्ताविक करून आजच्या दिवसाचे औचित्य साधून हात धुण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.श्री संदीप बारी सर यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.हात धुण्याचे महत्व पटवून सांगितले.

या कार्याक्रमानिमित्य स्वच्छतेचे संदेश विद्यार्थ्याकडून वदवून घेण्यात आले.श्री सागर चौखंडे सरांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री महेबूब शेख सरांनी विद्यार्थ्यांना  पुस्तक वाचनाचे महत्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री अटवाल सर,श्री शिवदास महाजन सर यांनी प्रयत्न केले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी तथा लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी


            दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी जि. प. प्राथमिक शाळा, शिरसाड शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहाद्दूर शास्त्री  यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. सागर चौखंडे यांना सर्वानुमते देण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. रविंद्र शामराव पाटील,  शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. जावेद हमीद तडवी तसेच शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावाच्या पोलीस पाटील सौ. दीपाली रविंद्र धनगर उपस्थित होत्या. यावेळी प्रथम प्रतिमेचे पूजन तसेच हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक श्री. संदीप बारी  यांनी केले. नंतर अमन तडवी, वेदिका धनगर, खुशी काटे, देवयानी धनगर, किमया महाजन, विद्या खंबायत या विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली. शाळेतील शिक्षक दीपक चव्हाण सर यांनी महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सागर चौखंडे सर यांनी या दोन्ही महापुरुषांचा जीवनप्रवास आपल्या शब्दांत मांडला. कार्यक्रमाचे उपशिक्षक श्री. शिवदास पंडित महाजन यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दीपक वसंतराव चव्हाण केले. चॉकलेट्स वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिक्षक दिन

सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती

     आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी जि प प्राथमिक शाळा शिरसाड येथे श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांची  जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक चव्हाण यांनी केले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र शामराव पाटील यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा धारण करून शाळेत उपस्थिती लावली. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. अमन तडवी, पाकिजा तडवी,भारती जुमडे, देवयानी धनगर या विद्यार्थ्यांनी भासाने केली.

     शाळेतील शिक्षक श्री शेख सर ,श्री सागर चौखंडे सर, श्री राजेंद्र महाजन सर,श्री शिवदास महाजन सर, श्री संदीप बारी सर,श्री राजेंद्र अटवाल सर श्री राजाराम अटवाल सर,श्री दीपक चव्हाण सर यांनी शिक्षक दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्याद्यापकांच्या संमतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.त्यानंतर शाळेच्या नियमित अध्यापनाला सुरुवात करण्यात आली.


जि. प. प्राथ. शाळा, शिरसाड शाळेची यशोगाथा  राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) मार्फत राष्ट्रीय पोर्टलवर प्रसिद्ध

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता यावल जि जळगाव  शाळेची यशोगाथा  राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) मार्फत राष्ट्रीय पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर 'शिक्षणातील प्रकाशवाटा'  ही राज्यभरातील शाळांच्या यशोगाथा संकलित केलेली पुस्तिका http://ncsl.niepa.ac.in/sla/casestudy/2022-23/maharashtra/yashogatha_mh_2022-23.pdf या लिंक वर उपलब्ध आहे. यानिमित्ताने शाळेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने अधिकारी तथा ग्रामस्थांनी शाळेचे कौतुक केले आहे. 26 सप्टेंबर रोजी  शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनकामी आयोजित केलेल्या पालक सभेमध्ये आणि केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये  तत्कालीन मुख्याध्यापिका संगिता धनंजय पाटील आणि शिक्षक वृंद यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यापूर्वी कोविड काळामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या मार्फत प्रसिध्द झालेल्या जिल्ह्यातील 'उपक्रमशील शाळा' या पुस्तिकेमध्ये शाळेची यशोगाथा प्रसिध्द झाली होती. मागील मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन  संस्था, औरंगाबाद अर्थात MIEPA मार्फत राज्यातील शाळांच्या यशोगाथा मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातील मुख्याध्यापक ते राज्यस्तर अधिकाऱ्यांचे सक्षमीकरण करणे, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, नवी दिल्ली (निपा) यांनी निर्देशित केल्याप्रमाणे शालेय नेतृत्व विकास संदर्भातील कार्यक्रम कार्यान्वित करणे, ही  शैक्षणिक नियोजन व्यवस्थापन व प्रशासन संस्था औरंगाबाद या संस्थेची उद्दिष्टे आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार शिरसाड शाळेची यशोगाथा महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन  संस्था, औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आली होती. संपूर्ण यशोगाथा शब्दांत मांडून संकलित करण्याचे काम शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक वसंतराव चव्हाण यांनी केले होते. MIEPA कडे प्राप्त सर्व यशोगाथा या NIEPA कडे पाठविण्यात आल्या. आणि  सर्व राज्यातील आलेल्या यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) मार्फत राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शिरसाड शाळेसाठी नक्कीच ही कौतुकास्पद बाब ठरली आहे. मागील वर्षीही शाळेस जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला होता. शाळेने मागील पाच वर्षांमध्ये आठ लाखापर्यंत लोकसहभाग मिळवून केलेल्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा तथा राबवलेले विविध उपक्रम, तंत्रज्ञानाचा शालेय प्रशासनामध्ये तथा अध्ययन-अध्यापनामध्ये केलेला प्रभावी वापर, शाळेची नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी सविस्तर माहिती सदर यशोगाथेमध्ये देण्यात आली आहे. याचे श्रेय शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील यांनी शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका संगिता धनंजय पाटील, शाळेतील शिक्षक वृंद  तथा शाळा व्यवस्थापन समिती यांना देऊन सर्वांचे अभिनंदन केले. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने शाळेमध्ये  सकारात्मक बदल व्हावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी,  यावलचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. संगिता धनंजय पाटील यांनी शाळेचे कर्तुत्ववान माजी विद्यार्थी,  केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, डाएट चे सन्माननीय अधिकारी तथा MEIPA आणि NIEPA यांचे आभार मानले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे "आजी आजोबा दिवस" साजरा

          दिनांक ११ सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे "आजी आजोबा दिवस" साजरा करण्यात आला.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपालीताई सुभाष इंगळे या होत्या. कार्यक्रमास चाळीस पेक्षा जास्त आजी-आजोबा उपस्थित होते. सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित आजी आजोबा व लीडरमाता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक श्री संदीप पितांबर बारी यांनी केले.

            सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरे पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. आजी आजोबा पहिले मित्रच असतात. नात्याची तेव्हा तिथूनंच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नात पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असते. शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे यासाठी "आजी आजोबा" दिवस शाळेत साजरा करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी "आजी आजोबा' दिवस साजरा होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी "आजी आजोबा" दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी १० सप्टेंबर, २०२३ रोजी "आजी आजोबा" दिवस होता.  त्याअनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी अर्थात ११ सप्टेंबर रोजी हा दिवस विविध उपक्रम राबवून शाळेमध्ये साजरा करण्यात आला. 

          सर्वप्रथम सर्व विद्याथ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून दिला. त्यानंतर आजी आजोबांचे नातवांच्या जडणघडणीतील महत्त्व याबाबत शाळेचे उपशिक्षक श्री. दीपक वसंतराव चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी काही आजींनी पारंपारिक गीतांचे  उत्फूर्त  गायन करून सर्वांचे लक्ष वेधले.  तद्नंतर आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची हा खेळ सुद्धा घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी संगीत खुर्ची मध्ये रुखमाबई रामदास पाटील या आजी विजेत्या ठरल्या. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक दीपक वसंतराव  चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पाडून कार्यक्रमाचा उद्देश सफल व्हावं यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक राजाराम मोरे सर, शिवदास महाजन सर, राजेंद्र महाजन सर, महेबुब शेख सर, सागर चौखंडे सर यांनी प्रयत्न केले.

धन्यवाद.....!!

जि.. प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरी 

              दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी राधा-कृष्ण यांच्यासारखे  परिधान केलेले पोशाख सर्वांचे लक्ष आकर्षित करीत होते. दहीहंडी कार्यक्रमासाठी शालेय आवारामध्ये विशेष सजावट सुद्धा करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन थर लावून दहीहंडी फोडली व प्रसादाचे वाटप सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी, शिक्षक तथा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मनसोक्त दांडिया नृत्याचा आनंद घेतला. या कृष्ण जन्माष्टमी च्या कार्यक्रमास  अंगणवाडी सेविका व मदतनीस, लीडर माता पालक,  व गावातील युवक  यांनी उपस्थिती देवून विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना यावेळी कृष्ण जन्मकथासह इतर कथाही सांगण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा विशेष आनंद घेतला. शाळेतील उपशिक्षक श्री. राजेंद्र जगन्नाथ महाजन तथा श्री संदीप पितांबर बारी यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये गोपाळ कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील उपशिक्षक श्री. शिवदास पंडित महाजन, श्री. शेख महबूब सर श्री सागर चौखंडे सर, श्री. दीपक चव्हाण सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड शाळेत जलशुद्धीकरण सयंत्र कार्यान्वित

                        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे कै. जनार्दन झिपरूशेठ सोनार (साकळी) यांचे स्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती इंदूबाई जनार्दन सोनार (नाशिक) यांनी विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने जलशुध्दीकरण साठी R.O. Plant कार्यान्वीत करून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कंपनीचे मालक श्री. सचिन जनार्दन सोनी हे याकामी आपले योगदान देत आहेत. यापुर्वीही साकळी येथील जिल्हा परिषदेच्या दोन्ही मराठी माध्यमाच्या शाळांना त्यांनी जलशुद्धीकरण सयंत्र कार्यान्वीत करून दिले आहे. कंपनी कडून श्री. धनराज चौधरी यांनी R.O. सयंत्र बसवून दिल्याबद्दल त्यांचे शाळेकडून आभार मानण्यात आले. साकळी परिसरातील शाळांना R.O. जलशुध्दीकरण सयंत्र मिळावे यासाठी साकळी येथील शिक्षणप्रेमी श्री. वाय. जी. नेवे हे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाने R.O. सयंत्र 15 ऑगस्ट रोजी शाळेत कार्यान्वीत झाले. याबद्दल श्री. वाय. जी. नेवे यांचेही शाळेकडून विशेष आभार मानण्यात आले. साकळी आणि शिरसाड या गावांतील शाळेतील विद्यार्थी तथा शिक्षक यांना या R.O. सयंत्राचा नक्कीच फायदा होणार आहे.

जिल्हा परिषद शाळा, शिरसाड येथे ७७वा स्वातंत्र्य दिनी भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या जवानाचा सत्कार

                दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक, शाळा, शिरसाड ता- यावल जि- जळगाव या शाळेमध्ये ७७वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय आवर स्वच्छता तथा सुशोभन करून परिसर सुशोभित करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनी प्रातःकाळी गावातून शालेय बँड पथकासोबत उत्साहवर्धक घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान गावातील मागील वर्षी सैन्य दलात भरती झालेले जवान श्री. नयन गणेश बाऱ्हे यांना देण्यात आला. तत्पूर्वी श्री. सागर चौखंडे सरांनी उपस्थितांकडून संविधानाचे वाचन करून घेतले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड येथील लेझीम पथकाने तेथे सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले. उपस्थितांना पंचप्राण शपथ देऊन प्रभातफेरी शाळेकडे रवाना झाली.

              त्यानंतर शालेय परिसरामध्ये ध्वजारोहणासाठी उपस्थित मौजे शिरसाड गावाचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे, उपसरंच श्री. राजू बन्सी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दीपाली सुभाष इंगळे, आणि ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, इतर सर्व पदाधकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका तथा मदतनीस, निपुण भारत अंतर्गत लीडर माता, ज्येष्ठ नागरिक, युवक माजी विद्यार्थी, आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक यांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संविधानाचे वाचन करून शालेय ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दीपाली सुभाष इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावाचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदीप बारी सर यांनी केले. याप्रसंगी भारतीय सैन्य दलात भरती झालेले गावातील प्रथम जवान आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. नयन गणेश बाऱ्हे यांचा आणि अंगणवाडी मध्ये मदतनीसपदी नव्याने नियुक्त झालेल्या सौ. शुभांगी गणेश तायडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील वेदिका प्रवीण धनगर, देवयानी धनगर, अमन रशीद तडवी, यशवंती गणेश बडगुजर, भरतर गणेश बडगुजर या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषणे केली. ग्रामपंचायत चे सन्माननीय सरपंच श्री. दीपक इंगळे यांनी देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस सौ. शुभांगी गणेश तायडे यांनी उत्फुर्त भाषण करून आपली चुणूक दाखवली.

         त्यानंतर निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत उपस्थितांना निपुण शपथ देऊन उपस्थित लीडर मातांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांनी स्वतःचा परिचय उपस्थित ग्रामस्थांना करून देत विद्यार्थी गुणवत्ता विकासाप्रती आपली कटिबद्धता अभिव्यक्त केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कोणशिलेचे याप्रसंगी पूजन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी शालेय कार्यक्रमाबद्दल व विद्यार्थी सहभागाबद्धल समाधान व्यक्त करत शाळेला शुभेच्छा दिल्या. यावेळी या शैक्षणिक वर्षातील लोकसहभागाबाबत आणि शालेय उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक वसंतराव चव्हाण सर तर आभार प्रदर्शन श्री. संदीप पितांबर बारी सर यांनी केले. यानंतर खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तृणधान्य जागरूकता मोहीम

                         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना अंतर्गत तृणधान्य जागरूकता महोत्सव 2023 साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश बडगुजर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच विशेष अतिथी म्हणून साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री किशोर चौधरी सर उपस्थित होते. गावातील कृषी मित्र यांनी तृणधान्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप बारी सरांनी केले. कार्यक्रमाला चव्हाण सरांनी मार्गदर्शन करून तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले. आभार प्रदर्शन एस पी महाजन सर यांनी केले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस कार्यक्रमास उपस्थित होत्या.त्यानंतरविद्यार्थ्यांनी तृणधण्यापासून बनलेल्या विविध पदार्थाच्या स्टॉल चे उदघाटन शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश बडगुजर यांनी केले.त्यानंतर उपस्थितांनी  विविध स्टॉल ला भेटी देऊन विविध पदार्थाचा आस्वाद घेतला.

जि. प. प्राथमिक शाळा, शिरसाड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

         दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड ता- यावल येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राजाराम मोरे सर यांच्या हस्ते करून पुष्पहार  अर्पण करण्यात आला. तदनंतर शाळेतील शिक्षक श्री. शेख सर यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले. श्री. दीपक चव्हाण सरांनी आदिवासी जनसमुदाय व त्यांचे जंगल संवर्धन यातील महत्व सांगितले. श्री. सागर चौखंडे सरांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध जनजामाती यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता निमित्त "मेरी माटी मेरा देश" या केंद्रशासन पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी तथा शिक्षक यांनी  'पंचप्रण शपथ' घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन श्री. संदीप बारी सरांनी केले.

जि प मराठी शाळा शिरसाड येथे दिनांक 24 जुलै 2023 रोजी समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न आला. कार्यक्रमास उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री गणेश नामदेव बडगुजर तसेच समितीचे इतर सदस्य सौ कविता प्रमोद सोनवणे, श्री रवींद्र रमेश खंबायत, श्री उल्हास रूपचंद ढाके व विद्यार्थ्यांचे पालक आणि उपस्थित ग्रामस्थ यांच्या हस्ते शालेय गणवेश संच वाटप करण्यात आले. 

जि प मराठी शाळा शिरसाड येथे दिनांक 24 जुलै 2023 रोजी समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न आला. कार्यक्रमास उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री गणेश नामदेव बडगुजर तसेच समितीचे इतर सदस्य सौ कविता प्रमोद सोनवणे, श्री रवींद्र रमेश खंबायत, श्री उल्हास रूपचंद ढाके व विद्यार्थ्यांचे पालक आणि उपस्थित ग्रामस्थ यांच्या हस्ते शालेय गणवेश संच वाटप करण्यात आले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे शिवजयंती उत्साहात साजरी

     दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सौ संगिता धनंजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर "जय जय महाराष्ट्र माझा" या  राज्यगीताचे   सामूहिक गायन करण्यात आले . शालेय विद्यार्थी अमन रशिद तडवी, यशवंती , उत्कर्ष प्रभाकर , भरतर गणेश , अनिकेत प्रमोद इंगळे ऋतुजा समाधान मिस्तरी , वेदिका प्रवीण धनगर , रुचिता समाधान मिस्तरी , वैष्णवी कांतीलाल कोळी , शितल विठ्ठल सोनवणे यांनी शिवरायांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. रिजवान अजित तडवी इ ४थी याने शिवरायांच्या कार्याची महती आपल्या उत्स्फूर्त प्रेरणादायी गीतगायनातून उपस्थितांना प्रेरकपणे दिली. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी केलेली महाराष्ट्राची पारंपारिक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती .शाळेतील उपशिक्षक श्री दीपक वसंतराव चव्हाण सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगिता धनंजय पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फेपेन व चॉकलेट असे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्वांचे आभार श्री. दीपक चव्हाण सर यांनी मानले.


महाराष्ट्र गीत गायन....

https://youtu.be/A2vtDOkaIVE

रिजवान अजित तडवी....

https://youtu.be/oztHWs2tOtE

महाराष्ट्र गीत गायन....

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

          दिनांक १२/०३/२०२३ रोजी  जि प प्रा शाळा शिरसाड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रगती हरिचंद्र पाटील इ १ली, आलिया अजित तडवी ३री, रुचिता समाधान मिस्तरी, शितल विठ्ठल सोनवणे इ ४थी यांनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. अमन रशिद तडवी, आर्यन भावलाल भालेराव, आलिया अजित तडवी, रुचिता समाधान मिस्तरी ऋतुजा समाधान मिस्तरी, देवयानी हिरालाल धनगर या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आपले विचार मांडले. श्री दीपक वसंतराव चव्हाण सर व मुख्याध्यापक सौ संगिता धनंजय पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती  सांगितली. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळ, लीडर माता भुराबाई अजित तडवी, कमलाकर पवार, श्री. महेंद्र भास्कर पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री किशोर भटू पाटील यांनी परिश्रम घेतले. खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.           

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन मोठ्या उत्साहात  साजरा

          दिनांक ३ जानेवारी  २०२३ मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. प्रथम शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिपाली सुभाष इंगळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. त्यानंतर शाळेतील इयत्ता १ली ते ४थी चे विद्यार्थी अमन रशीद तडवी, रिजवान अजित तडवी, आकांक्षा कैलास ठाकूर, ऋतुजा समाधान मिस्तरी , शितल विठ्ठल सोनवणे या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या सावित्रीबाईंच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. अंगणवाडी सेविका कोकिळाबाई उत्तम पाटील यांनी सावित्रीबाईंच्या कार्यामुळे आज आपण सुशिक्षित झालो व त्यामुळे आपल्या परिवाराचा देखील विकास झाल्याचे सांगितले. शाळेतील उपशिक्षक  श्री. शेख सर, श्री. किशोर पाटील सर आणि श्री दीपक वसंतराव चव्हाण सर  यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई तथा त्यांनी समाजासाठी पार पाडलेल्या विविध भूमिकांविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवनातील बालपणीची कथा सांगत विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंचा खडतर जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.  याप्रसंगी शाळेतील उत्कर्षा प्रभाकर जाधव , अंकिता किरण सपकाळे वेदिका प्रविण धनगर इ ३री. आकांक्षा कैलास ठाकूर , विद्या रविंद्र खंबायत, भारती गोपाळ जुमळे इ२री या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेषभूषा करून उपस्थितांची मने जिंकली . त्या विद्यार्थिनींचा तसेच अमन रशीद तडवी व रिजवान अजित तडवी यांना पेन व पुष्प बक्षीस देऊन गौरविण्यात आले .  त्याचबरोबर इयत्ता 1ली मधील विद्यार्थिनी कु शाहिदा नथ्थू तडवी हिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत 360/- रुपयांच्या धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमास  शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे, शिक्षण प्रेमी सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य  श्री उल्हास रुपचंद ढाके , ज्योती कैलास ठाकूर , भुराबाई अजित तडवी, अमिना नथ्थू तडवी, संगिता किशोर भालेराव, रंजना संतोष खंबायत, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक चव्हाण सर यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

     दि २९/१२/२०२२ रोजी   शारदा विद्यामंदिर साकळी येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय शिक्षणपरिषदेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथील उपक्रमशील तंत्रस्नेही विद्यार्थीप्रिय कर्तव्यनिष्ठ उपशिक्षक श्री. दीपक वसंतराव चव्हाण यांचा नवोपक्रम सादर केल्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. किशोर चौधरी सर व शारदा विद्यामंदिर साकळीचे प्राचार्य श्री. आर. जे. महाजन सर यांनी सत्कार केला . श्री दीपक वसंतराव चव्हाण सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

दि २४ डिसेंबर २०२२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे मातृहृदयी प पूज्य सानेगुरुजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्राथमिक शाळा शिरसाड येथे पालक संपर्क अभियान उत्साहात संपन्न 

      आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पालक संपर्क अभियान मेळावा पार पडला. कार्यक्रमास गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री दिपक वामन इंगळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सरस्वती पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. शाळेतील इ ४थी च्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे स्वागतगीत गाऊन स्वागत केले. सर्व उपस्थितांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता धनंजय पाटील यांनी निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पालक संपर्क अभियानाचा उद्देश पालकांना सांगितला. शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर 2026 -27 पर्यंत भाषिक कौशल्य व मूलभूत क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने निपुण भारत कार्यक्रमाचे आखणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आणि प्रचार प्रसार करणे या दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्यात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब यांनी 22 डिसेंबर 2022 रोजी पालक संपर्क अभियानाचे जळगांव जिल्ह्यांमध्ये आयोजन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात पालकांचा प्रभावी सहभाग मिळवणे विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत पालकांना अवगत करणे व त्यांचा प्रतिसाद मिळवणे शालेय उपक्रमाबाबत अभ्यासपूरक उपक्रमाबाबत पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत पालकांशी चर्चा करणे विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबद्दल व नियमित अध्ययन बाबत पालकांना अवगत करणे शालेय व अभ्यासेतर उपक्रमांसाठी पालकांचा प्रभावी आर्थिक सहभाग मिळवणे पालक शिक्षक  आंतरक्रिया प्रभावी होण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी हे अभियान राबविण्यात आले. दिनांक 21 डिसेंबर २०२२ रोजी गावामध्ये दवंडी देऊन सर्व पालकांना जाहीररित्या  पालकसंपर्क अभियानास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते . याप्रसंगी निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली. शाळेचे उपशिक्षक श्री मेहबूब शेख सरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना पालक संपर्क अभियान व निपुण भारत अभियान याबाबत सविस्तर माहिती दिली . निपुण भारत कार्यक्रमांतर्गत लीडर माता गटांची स्थापना झालेली असून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पालक गट कार्यरत आहे. पालकांनी ,लीडरमातांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सौ सविता समाधान मिस्तरी, सौ. भुराबाई अजित तडवी श्री शरद शंभू काटकर यांनी शाळेविषयी व विद्यार्थ्यांविषयी आपले मत मांडले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळा व शिक्षक अतिशय चांगल्या रीतीने कामगिरी करत आहे असे श्री. शरद काटकर यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री प्रभाकर पुना जाधव यांनी देखील आपले मत व्यक्त करताना शाळेविषयी व शाळेत होणाऱ्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. गणेश नामदेव बडगुजर यांनी देखील पालकांनी जबाबदारीने आपापल्या पाल्याच्या प्रगतीसाठी कटीबद्ध राहावे असे आवाहन केले. केंद्रप्रमुख श्री किशोर संतोष चौधरी यांनी सांगितले की शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण हे पालक संपर्क अभियान राबवित आहो. सर्व पालकांनी या अभियानात आपापली जबाबदारी ओळखून शाळेला व शिक्षकांना सहकार्य करावे की जेणेकरून आपले मूल प्रगत होईल निपुण होईल व त्यामुळे आपल्या गावाचा विकास होण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिपक वामन इंगळे सरपंच यांनी सांगितले की शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सतत प्रयत्नशील आहे. आपणही आपापल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असावे असे आवाहन त्यांनी उपस्थित पालकांना केले. आपापल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती विषयी वर्ग शिक्षकांना भेटून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडविण्यास शिक्षकांना व शाळेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास उपसरपंच श्री राजू बन्सी सोनवणे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे श्री. गणेश नामदेव बडगुजर उपाध्यक्ष शा व्य.स. सौ कविता प्रमोद सोनवणे सौ कलिमा सुनिल तडवी श्री. रविंद्र रमेश खंबायत श्री प्रभाकर पुना जाधव सदस्य शाळा व्यवस्थापन समिती केंद्रप्रमुख श्री किशोर संतोष चौधरी व इ. १ली ते ४थी चे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंगणवाडी सेविका, मदतनीस लीडर माता व आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर भटू पाटील व श्री राजेंद्र प्रकाश अटवाल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. वंदे मातरम ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

दि- २०/१२/२०२२  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे संताजी जगनाडे महाराज  यांची जयंती उत्साहात साजरी

     दि ०८ डिसेंबर २०२२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम आवारसफाई, वर्ग सफाई करण्यात आली परिपाठानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापिका सौ संगीता धनंजय पाटील यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तदनंतर सर्व शिक्षकांनी प्रतिमा पूजन करून वंदन केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी  वर्गनिहाय प्रतिनिधींनी श्री संत जगनाडे महाराज यांचे पूजन करून वंदन केले. श्रीयुत राजेंद्र अटवाल सर यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या विषयी, त्यांच्या अध्यात्मिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे शिष्य संत, त्यांचे वडील विठोबा जगनाडे आई माथाबाई पत्नी यमुनाबाई .तेली समाजाचे संत होऊन गेले. पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी आठ डिसेंबर १६२४ रोजी त्यांचा जन्म झाला. आई-वडील दोघेही विठ्ठल भक्त होते. लहानपणापासून धार्मिक संस्कार झाले. लहानपणापासूनच त्यांना कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय लागली. त्यामुळे नंतर ते संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक झाले. श्री दीपक चव्हाण सर यांनी सुंदर अभंग म्हटला. जय जय राम कृष्ण हरी भजन म्हटले. विद्यार्थ्यांकडूनही म्हणून घेतले. तुकाराम महाराजांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेतले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ते आवडते शिष्य होते. त्यांच्या निष्ठेचे पालन करून आपण आपले जीवन समृद्ध करूया असे सांगितले. सौ. संगीता धनंजय पाटील यांनी सांगितले की संताजी महाराजांचे गुण अंगी बाणून ते आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे. प्रखरनिष्ठा आपण आपल्या अंगी बाणावी असे सांगून कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. https://youtu.be/IntOLgJp9T8

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 

       आज दिनांक ६ डिसेंबर २०२२ मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता धनंजय पाटील मॅडम यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रतिमा पूजन करून प्रतिमेस वंदन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना सादर केली. शाळेचे उपशिक्षक श्री मेहबूब शेख सर यांनी महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोर आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक लिहिले त्यातूनच  रिझर्व बँकेची संकल्पना पुढे आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर दररोज २१ तास अभ्यास करत  असत. तुम्ही सुद्धा किमान दोन दररोज घरी अभ्यास करत जा असे सांगितले. त्यानंतर शाळेचे उपशिक्षक श्री दीपक चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय करून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगात सर्वात जास्त पुस्तके वाचली. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा आहेत. वाचाल तर वाचाल. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण सगळ्यांनी जीवन जगले पाहिजे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील मॅडम यांनी मुलांना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे दररोज स्मरण करून आपले जीवन समृद्ध करूया. आपल्या कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून प्रगतीकडे वाटचाल करावी असे विद्यार्थीना सांगितले.

      दि १९/११/२०२२  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती प्रतिमापूजन, माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे, सदस्या सौ गायत्री राजेंद्र लवंगे, श्री. रविंद्र रमेश खंबायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती पालक सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंदउपस्थित होते.

                 जि. प. प्रा. शाळा शिरसाड येथे 14/11/2022 रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना पेन चॉकलेट वाटप करून शा. पो. आहारासोबत गोड शिरा देण्यात आला. अशा प्रकारे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

       दि- १५/११/२०२२ रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे जननायक, थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन, माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

            दिनांक 28/11/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम शाळेच्या मुख्याध्यापक सौ संगीता धनंजय पाटील यांनी प्रतिमा पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रतिमा पूजन केले व प्रतिमेस वंदन केले. शाळेचे उपशिक्षक श्री. शेख सर यांनी विद्यार्थ्यांना ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. पूर्वीच्या काळी मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवत नसत. फक्त मुलेच शिक्षण घेत असत. हा भेदभाव महात्मा ज्योतिबा फुले यांनी मोडीस घालण्यासाठी प्रथम त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून मुलींसाठी पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाड्यात  सुरू केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज महिलांनी सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली दिसून येते.चूल व मूल सांभाळून आज महिला सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे .तसेच शाळेतील उपशिक्षक श्री किशोर सर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय करून दिला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व मुलींना नियमित शाळेत येण्याचे आवाहन केले. तसेच श्री. दीपक चव्हाण सर यांनी ज्योतिबा फुले यांच्या प्रसिद्ध सुविचाराचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला . 

विद्ये विना मती गेली 

मती विना नीती गेली 

निती विना गती गेली 

गती विना वित्त गेले 

वित्ता विना  शुद्र खचले

 इतके अनर्थ एका अविद्येने केले.

विद्या नसेल तर माणसाचे कसे नुकसान होते हे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्मिक शब्दात सांगितले. तसेच शिक्षण सक्तीचे असल्याने आपल्याला कोणीही शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. शिक्षण हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. सारे शिकूया , पुढे जाऊया. त्यानुसार आपली प्रगती उंचावूया असे मुलांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन

    दि १९/११/२०२२ रोजी   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता यावल जि- जळगाव येथे निपुण भारत कार्यक्रम  अंतर्गत  निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्याचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री. नईम शेख साहेब, साकळी केंद्राचे  केंद्रप्रमुख श्री किशोर चौधरी सर यांची उपस्थिती लाभली.  त्याचबरोबर शिरसाड गावचे उपसरपंच श्री. राजू बन्सी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दीपाली सुभाष इंगळे यांच्यासह माता गटाच्या लीडर सौ. भारती रविंद्र खांबायत, सौ. ज्योती कैलास ठाकूर, सौ. सविता समाधान मिस्तरी, सौ. मोनाली दीपक खांबायत यांच्यासह इतर अनेक माता पालक उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित लीडर माता व इतर मातापालकांना मा. गटशिक्षणाधिकारी श्री. शेख साहेब यांनी निपुण भारत कार्यक्रमाचा हेतूसह माता गटाच्या निर्मितीचा उद्देश, यामधील लीडर मातांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन करून मातांचे मनोबल वाढवले. यावेळी उपस्थित माता पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला.  सदर सभेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता पाटील मॅडम यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

जि. प. प्रा. शाळा शिरसाड येथे १५ऑक्टोबर २०२२ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आल. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले.

    दि.26/11/2022 वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ संगिता धनंजय पाटील मॅडम यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला . संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले . शाळेतील उपशिक्षक श्री शेख सर व श्री दीपक चव्हाण सरांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासह संविधाना बाबत अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली .  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगिता मॅडम यांनी विद्यार्थांना संविधानाचे पालन काटेकोर पणे करण्यात यावे, त्याच प्रमाणे शाळेचे ही काही नियम ठरवून दिले असतात त्यांचेही पालन आपण विद्यार्थी दशेत असताना केले तर आपल्याला चांगली शिस्त लागून आपले जीवन आदर्श होते असे सांगितले. सर्वांनी संविधानाचा मान ठेवून रक्षण करण्यासाठी सक्षम व्हावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे "BALA प्रकल्प" अंतर्गत  प्रेरणा सभा क्रमांक 2 झाली सफल

        दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे "बाला प्रकल्पांतर्गत" शिरसाड गावचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे त्यांच्या अध्यक्षतेखाली  जाहीर प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांनी BALA अर्थात Building as Learning Aids म्हणजेच शालेय इमारतीचा एक शैक्षणिक साधन म्हणून विकास करणे होय, हे सांगत यामधील विविध निकष उपस्थित पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला. यासाठी अंदाजित 3 लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगून किमान त्यापैकी 30% अर्थात नव्वद हजार रुपये लोकसहभागातून जमा व्हावेत असे शासनास अपेक्षित असल्याने निधी किंवा प्रकल्पासाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांनी उपस्थितांना केले. या नियोजित प्रेरणा सभेस  विस्तार अधिकारी श्री. विश्वनाथ धनके साहेब, दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर सर, साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. किशोर चौधरी सर यांनी उपस्थित राहून प्रेरक असे मार्गदर्शन  करून पालकांचे प्रबोधन करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. व शाळेतील शिक्षक श्री. किशोर पाटील  यांनी BALA प्रकल्पाविषयी प्रोजेक्टर वर विस्तृत मार्गदर्शन केले. या सर्व बाबींच्या एकत्रित परिनामातून 20 हजार पेक्षा जास्त निधी उपलब्ध होणे शक्य झाल्याने या दुसऱ्या प्रेरणा सभेचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल.  यामध्ये  दिपाली सुभाष इंगळे ११०० रू, श्री. राजू बन्सी सोनवणे ११०० रु , श्री. ज्ञानेश्वर अरुण बडगुजर ११०० रू, सौ. लक्ष्मी विठ्ठल सोनवणे २०० रू, श्री प्रताप दगडू पाटील ५०० रू, हिरालाल भगवान धनगर ५०० रु,  श्री भागवत रमेश खंबायत ५०० रू, श्री. धनके साहेब ५०० रू, श्री. विजय ठाकूर साहेब५०० रू श्री. किशोर चौधरी साहेब ५०० रू असे एकूण ६५००रु रोख  प्राप्त झाले तर श्री. प्रमोद रमेश सोनवणे ११०० रू, श्री. प्रविण तुकाराम सोनवणे ११०० रू, हजरत अली स्वंयसहाय्यता महिला बचत गट ११०० रू, सौ. रिंकू लिलाधर काटे २०० रू, सौ भुराबाई अजित तडवी ५०० रू स्व. शरीफा रहिमान तडवी यांच्या स्मरणार्थ तनुजा महम्मद तडवी यांनी ५०१ रू आणि  सर्व शिक्षकवृंद यांनी एकत्रित ११००० रु देण्याचे जाहीर केले. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या प्रेरणा सभेवेळी श्री अरुण प्रेमचंद राजपूत ५५५५ रु,  कै . नर्मदाबाई कोंडू खंबायत यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद कोंडू खंबायत यांच्या कडून ५००० रु असा निधी  बाला प्रकल्पासाठी जमा झाला होता. त्यामुळे आजपर्यंत ३० हजार पेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी जमा झाला आहे. आणि लवकरच अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. या दुसऱ्या पालक सभेस ग्रामपंचायत सदस्य श्री. तेजस पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. या नियोजित पालक प्रेरणा सभेस ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. राजू बन्सी सोनवणे,  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपाली सुभाष इंगळे, उपाध्यक्ष गणेश नामदेव बडगुजर, सदस्या सौ कविता प्रमोद सोनवणे श्री. रविंद्र रमेश खंबायत सदस्य सौ. ज्योती प्रवीण सोनवणे सदस्या सौ. कलिमा सुनील तडवी सदस्या सौ. भारती राजेंद्र लासुरे, सदस्य श्री. ज्ञानेश्वर अरूण बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य श्री. उल्हास रुपचंद ढाके, श्री. तेजस धनंजय पाटील, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री. प्रमोद रमेश सोनवणे, अंगणवाडी सेविका तथा मदतनीस आणि विद्यार्थ्यांचे माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक वसंतराव चव्हाण यांनी केले.  नियोजित दुसरी प्रेरणा सभा शिक्षक वृंदाच्या  सहकार्यातून यशस्वी पार पडली.

दिनांक:- 31/08/2022, बुधवार.

आमच्या शाळेच्या www.zpschoolshirsad.in या वेबसाईटचे अनावरण होऊन एक वर्ष पूर्ण.

 

                          आज आमच्या शाळेची वेबसाईट PUBLISH होऊन एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी दिनांक 31/08/2021 रोजी कोरपावली ता- यावल येथे झालेल्या साकळी व दहीगाव केंद्राच्या संयुक्त शिक्षण परिषदेमध्ये यावल तालुक्याचे म. गटशिक्षणाधिकारी नईम शेख साहेब यांच्या हस्ते वेबसाईटचे अनावरण झाले होते. गेल्या वर्षभरात शाळेमध्ये घेतलेले उपक्रम, झालेली विकास कामे, मिळालेला लोकसहभाग, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेमध्ये झालेला बदल इत्यादी बाबी सर्वांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.  या बाबींचा आज  मनस्वी आनंद होत आहे. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक, श्री दीपक वसंतराव चव्हाण यांनी  वेबसाईट च्या निर्मितीनंतर  त्यांनीच शाळेचे सर्व कार्यालयीन कामकाज करण्यासाठी तयार केलेली  अनोखी प्रणाली या वेबसाईट ला जोडण्यात आली. त्यामुळे  शाळेचे कामकाज सुलभ होण्यासाठी मोठा हातभार लागला आहे.  त्यामाध्यमातून  शालेय कामकाजासाठी आवश्यक पत्र निर्निती, विद्यार्थी बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला, किरकोळ  व अर्जित रजा अर्ज, SMC  अजेंडा इत्यादी सेवांचा वापर प्रत्यक्ष शाळेच्या वेबसाईट वरून सुरु झाला. आणि त्या माध्यमातून शाळेमध्ये कामकाजात डिजिटलायजेशन ऐवजी नेक्स्ट जनरेशन डिजिटलायजेशन सुरु झाल्याचा प्रत्यय येत आहे. या वर्षी शाळेला जिल्हा स्तरावर स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हे शाळेसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे आपली वेबसाईट म्हणजे  आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी, सर्व शिक्षणप्रेमी यांना आपली शाळा कोणत्या स्तरावर आहे आणि अजून शाळेसाठी काय करता येईल यासाठी हा दिशादर्शी प्रकल्प ठरला आहे.  यापुढेही आपणां सर्व पालकवर्ग , आजी माजी विद्यार्थी , शिक्षणप्रेमी , शाळा व्यवस्थापन समिती , मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्व सहकारी शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कार्यालय शिरसाड, दानशूर दाते यांच्या सहकार्याने शाळेचा सर्वांगीण विकासाचे कार्य अवितरपणे  चालू राहावे हाच प्रयत्न आणि अपेक्षाही.


  मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड ता-यावल जि- जळगांव

दि १४/०८/२०२२ रोजी जि प प्रा शाळा शिरसाड येथे भारतीय सैन्य दलातील जवान श्री. योगराज बापू वळींकार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले कार्यक्रमास सरपंच श्री. दिपक वामन इंगळे, शा. व्यस. अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे, सदस्या सौ कविता प्रमोद सोनवणे, सौ ज्योती प्रविण सोनवणे, सौ गायत्री विनोद सोनवणे ग्रा पं सदस्या श्री तेजस धनंजय पाटील ग्रा.पं सदस्य, सौ. चेतना योगराज वळींकार ग्रामसेवक श्री. साळुंके भाऊसाहेब गावातील प्रतिष्ठीत नागरिक, पालक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते.

जि प प्रा शाळा शिरसाड येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर झंडा अभियानांतर्गत आज शासन परिपत्रकान्वये दि १३/०८/२०२२ रोजी शाळेची विद्यार्थिनी कु. अंकिता शरद काटकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रा पं.सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा , उपाध्यक्ष सदस्य शा व्य.स . शिरसाड तसेच पालक अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

    दि १५/०८/२०२२ रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे अमृत महोत्सवी  स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इ ४थी च्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह सर्व विद्यार्थ्यांची सकाळी गावातून  प्रभात फेरी काढण्यात आली. रुखमाबाई रामदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. इ ४थी च्या यश फकिरा कोळी, योगिता दिपक खंबायत, रिजवान अजित तडवी, आर्यन भावलाल भालेराव, रुचिता समाधान मिस्तरी यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली. रिजवान तडवी याने देशभक्तीपर गाणे म्हटले. वरील सर्व विद्यार्थ्यांना सौ ज्योती प्रविण सोनवणे सदस्या शा. व्य. स यांनी बक्षिस म्हणून १०० रु व श्री वासुदेव रामदास बडगुजर यांनी ५०० रु दिले . त्यानंतर श्री राजेंद्र प्रकाश अटवाल  यांनी शाळेचे अहवाल वाचन केले. मुख्याध्यापिका सौ संगीता धनंजय पाटील यांनी बाला प्रोजेक्ट विषयी माहिती दिली. श्री शेख सर यांनी पीपीटी दाखवली. श्री. शेख मेहबूब शेख बशीर यांनी पालक संपर्क अभियानाबाबत माहिती दिली. तेजस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. किशोर चौधरी यांनी बाला प्रोजेक्ट विषयी माहिती सांगितली. श्री. राजू बन्सी सोनवणे उपसरपंच शिरसाड यांनी मुलांना बिस्किटे वाटप केली. श्री अशोक राजाराम नेवे यांनी तसेच कै .अशोक नेवे यांच्या  स्मरणार्थ श्री . अश्विन नेवे यांनी मुलांना चॉकलेट वाटप केले. गावातील हनुमान मित्रमंडळानेही बिस्कीट पुडे वाटप केले.  म मुख्य कार्यकारी अधिकारी जळगांव यांच्या १६ कलमी कार्यक्रमांतर्गत बाला प्रोजेक्टसाठी अरुण प्रेमचंद राजपूत यांनी ५५५५ रुपये तसेच श्री. अरविंद  कोंडू खंबायत यांनी कै. सौ नर्मदाबाई कोंडू खंबायत यांच्या स्मरणार्थ ५००० रुपये देणगी दिली. तसेच श्री भूषण लिलाधर अत्तरदे यांनी १०००० रु चे अम्प्लीफायर , माईक व माईक स्टॅन्ड शाळेला दिले. शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री. भूपेंद्र बाळाराम राजपूत यांनी कै. बाळाराम प्रेमचंद राजपूत यांच्या स्मरणार्थ शाळेला लायब्ररी साठी कपाट देण्याचे जाहीर केले आहे. दात्यांचे  शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. गावाचे सरपंच श्री दिपक वामन इंगळे, उपसरपंच श्री राजू बन्सी सोनवणे, सौ कविता प्रमोद सोनवणे सदस्या ग्रामपंचायत तथा शा. व्य. सदस्य,  सौ गायत्री विनोद सोनवणे, सदस्य ग्रा पं., श्री. उल्हास रुपचंद ढाके सदस्य ग्रामपंचायत तथा शा व्य.स., श्री. तेजस धनंजय पाटील सदस्य ग्रामपंचायत 'ग्रामसेवक श्री विजय साळुंके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे, उपाध्यक्ष श्री . गणेश नामदेव बडगुजर, श्री किशोर हरी इंगळे, श्री प्रभाकर पुना जाधव, श्री रविंद्र रमेश खंबायत सौ कलिमा सुनिल तडवी शा. व्य. स. सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक व युवा वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमाला भर पावसात उपस्थित होते. यावेळी आतापर्यंत झालेल्या लोकसहभागाची कामे व देणगी देणाऱ्या दात्यांच्या नावाचे फलक प्रदर्शित करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक वसंतराव चव्हाण यांनी केले.

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वाटप

   दि. ०५/०/२०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथेसन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील समग्र शिक्षा अंतर्गत १७१ लाभार्थी यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम शिरसाड गावाचे सरपंच श्री. दिपक वामन इंगळे उपसरपंच आ. श्री राजू बन्सी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे, उपाध्यक्ष श्री. गणेश नामदेव बडगुजर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या तथा ग्रामपंचायत सदस्या सौ. कविता प्रमोद सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या तथा ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योती प्रविण सोनवणे, सौ. गायत्री विनोद सोनवणे ग्रा पं सदस्या, श्री. रविंद्र रमेश खंबायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. किशोर चौधरी सर मुख्याध्यापिका सौ संगिता धनंजय पाटील व सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यार्थ्यांचे चेहरे नवीन गणवेश मिळाल्याने आंनदाने उजळून गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्री दीपक वसंतराव चव्हाणसर यांनी केले.

      शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत मेळाव्यास पालकांचा भरघोस प्रतिसाद

(दिनांक:- १९/०४/२०२२, मंगळवार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिला मेळावा पालकांच्या उत्फूर्त प्रतिसादासह उत्साहात संपन्न झाला. यावेळी जळगाव जिल्ह्याची मातृ शिक्षण संस्था अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव चे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. अरुण भांगरे साहेब यांची मेळाव्यास  विशेष उपस्थिती होती. दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेसात वाजता सर्व विद्यार्थी, शिक्षक, दाखल पात्र बालके व त्यांचे पालक माता-पिता, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सन्माननीय सदस्य,अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामस्थ व पालक सर्वांना सोबत घेऊन गावातून विविध घोषवाक्यांचे फलक घेऊन  उत्फूर्त घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल करावे  यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. 

                  मेळाव्याच्या पूर्व संध्येला गावामध्ये कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जनजागृतीस्तव दवंडी देण्यात आली होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दीपाली सुभाष इंगळे यांनी भूषवले तर कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव चे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. अरुण भांगरे साहेब यांच्यासह शिरसाड गावाचे उपसरपंच श्री राजू बन्सी सोनवणे व इतर सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य, माता- पालक, प्रतिष्टीत नागरिक, मेळाव्याचे स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांनी करून मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. वरिष्ठअधिव्याख्याता श्री. अरुण भांगरे साहेब यांनी मेळाव्यास उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक यांचासोबत संवाद साधत मेळाव्याच्या आयोजनाबाबत शासनाचा उद्देश व गरज व्यक्त करून कार्यक्रमाच्या अयोजानाबाबत कौतुक करत विद्यार्थ्यांना खाऊसाठी पैसेही देऊ केले. या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक , ग्रामपंचायत , अंगणवाडी , शाळा आणि स्वंयसेवक यांची मुख्य भूमिका या मेळाव्यातून सर्वांना समजली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन  करून सर्व सात ही स्टॉलवर दाखल पात्र बालकांची विविध कृती ,खेळ, उपक्रम, याद्वारे  संवाद साधत क्षमता पडताळणी करून विकास पत्र देऊन सर्व  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत  त्यांना खाऊ देण्यात आला. स्वंयसेवकांसह मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या एकत्रित प्रयत्नातून मेळाव्याचे उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आले. मेळाव्यास दाखलपात्र पालकांचा आणि पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांच्या व माता- पालकांच्या चेहऱ्यावर विशेष कुतूहल दिसत होते.

जि. प. प्राथ. शाळा, शिरसाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

                                        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड ता- यावल जि- जळगाव  येथे विश्वरत्न, महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास मौजे शिरसाड गावाचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे, उपसरपंच श्री राजू बन्सी सोनवणे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दीपाली सुभाष इंगळे यांनी विशेष उपस्थिती दाखवली. यावेळी शाळेतील ३री मधील विद्यार्थी  योगिता दीपक खंबायत, आर्यन भावलाल भालेराव, रिजवान अजित तडवी, गायत्री कैलास बडगुजर, रुचिता समाधान मिस्‍तरी, ऋतुजा समाधान मिस्तरी आणि इ.४थी मधील प्राजक्ता किरण सपकाळे या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व कार्य गौरव आपल्या शब्दात उस्फूर्तपणे मांडला. यावेळी ‘चवदार तळ्याचे पाणी’ या गीताचे सामुहिक गायनही करण्यात आले. शिरसाड गावाचे सरपंच श्री. दीपक वामन इंगळे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या जीवनातील कटू प्रसंग शब्दातून मांडत उपस्थितांना भावूक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील, उपशिक्षक श्री. दीपक वसंतराव चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आपल्या शब्दात मांडला. गावाचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच श्री. दीपक वामन इंगळे, उपसरपंच श्री राजू बन्‍सी सोनवणे यांच्यासह माजी उपसरपंच श्री दिलीप बंडू भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिपाली सुभाष इंगळे, सदस्य सौ. कविता प्रमोद सोनवणे, श्री उल्हास रूपचंद ढाके, श्री. प्रभाकर पुना जाधव, श्री. रविंद्र रमेश खंबायत, सौ.कलिमा सुनिल तडवी, भारती राजेंद्र लासुरे, यांच्यासह श्री. गणेश रोहिदास तायडे, सन्माननीय ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच  शाळेचे माजी विद्यार्थी इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते.  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .संगीता धनंजय पाटील यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी इयत्ता ३री मधील विद्यार्थी कु. आर्यन भावलाल भालेराव याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तर  कु. प्राजक्ता किरण  सपकाळे या विद्यार्थिनीने माता रमाई यांची वेशभूषा केली होती. शाळेचे  तंत्रस्नेही शिक्षक श्री दीपक वसंतराव चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

                       महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

(११ एप्रिल २०२२)

           शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे शिक्षणतज्ज्ञ , क्रांती सूर्य ,थोर तत्वज्ञ ,महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती.... यानिमित्त जि. प .प्रा . शाळा शिरसाड, ता- यावल जि- जळगाव  येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री महेबूब शेख, श्री दीपक वसंतराव चव्हाण आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड येथे CCTV यंत्रणा कार्यान्वित.

                 दि 04/04/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड ता- यावल जि- जळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दिपाली सुभाष इंगळे यांच्या उपस्थितीत CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शालेय भौतिक सुविधांची सुरक्षा व्हावी यासाठी ही CCTV यंत्रणा आवश्यक होती. ही यंत्रणा शाळेचे एक माजी विद्यार्थी श्री महेश सुभाष पाटील यांनी शाळेसाठी कार्यान्वित करून दिली आहे. यासाठी जवळजवळ 80000/- (ऐशी हजार रुपये) निधी त्यांनी खर्च करून 7 बुलेट कॅमेऱ्यासह चांगली आणि अद्ययावत यंत्रणा बसवून दिली आहे. शालेय इमारत, रंगरंगोटी, परसबाग, शालेय बाग, शौचालये तथा इतर भौतिक सुविधा इत्यादी ची होणारी नासधूस थांबण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे.  शाळेचे पूर्ण आवार यामुळे दृष्टीक्षेपात आले आहे. अलीकडे बहुतांशी शाळांमध्ये TV, प्रोजेक्टर, संगणक तथा इतर मौल्यवान साहित्य वाढल्याने शाळा समृद्ध झाल्या आहेत. त्यामुळे शाळांमध्ये चोरीचपाटीचे प्रमाणही अलीकडे वाढलेले दिसत आहे. याला चाप बसावा यासाठी अशी यंत्रणा आवश्यक होती. मागील आठवड्यात मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी प्रत्येक जि प शाळेत CCTV यंत्रणा बसवण्याबाबत स्तुतोवाच केले होते. पण त्यापूर्वीच जि प शाळा शिरसाड येथे CCTV यंत्रणा लोकसहभागातून कार्यान्वित झाली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सौ दिपाली सुभाष इंगळे,  उपाध्यक्ष श्री गणेश नामदेव बडगुजर  आणि इतर सदस्य यांनी आनंद व्यक्त केला आहे. CCTV यंत्रणा शाळेस उपलब्ध करून देणारे माजी विद्यार्थी श्री महेश सुभाष  पाटील यांचे शाळेकडून आभार मानण्यात आले.